संदीप क्षीरसागरला धडा शिकवण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागराच्या आम्ही पाठीशी…नाईकवाडे,पाटील
संदीप क्षीरसागर ने बीड जिल्ह्याचे वाळवंट केले.

बीड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना बीडची माजी नगरसेवक अमर नाईकवाडे व फारूक पाटील यांनी बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत बीड मतदारसंघाची वाळवंट केल्याची आरोप केला. गेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांना निवडून आणण्या मध्ये अमर नाईकवाडे, फारूक पटेल यांचा खारीचा वाटा होता, परंतु आमदार झाल्यापासून क्षीरसागर यांनी बीडचा विकास केला नसून भकास केला आहे. कामात टक्केवारी घेत असल्याचा आरोप यांनी केला. त्यामुळे यांनी संदीप क्षीरसागर च साथ सोडून जयदत्त क्षीरसागर गटात प्रवेश केला. ऐनवेळी जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने योगेश क्षीरसागर यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे अमर नायकवडे व फारूक पटेल यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांच्यासोबत एकत्रित बसून बीडचा विकास करायचा असेल तर योगेश क्षीरसागर यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा प्रचार करत असून बैठकावर भर देत असल्याचे सांगण्यात आले. तसेच संदीप क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षात फक्त टक्केवारी घेतली व बीड अधिकाऱ्यांना दबाव टाकल्याने बीडच विकास खुंटला आहे.बीड शहराचा विकास करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून आणि बीडचा विकास करणार असून निवडणुकीमध्ये डॉ.योगेश यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार व साथ देणार असल्याचे ठामपणे सांगण्यात आले.