अर्चना कुटेचा अटकपूर्व जामीन फेटाळला !
हजारो कोटी रुपयाचा गंडा घालणाऱ्या अर्चना कुटे फरार कश्या?

बीड ज्ञानाराधा मल्टीस्टेटने ठेवेदारांना ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची फसवणूक केली.बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये जवळपास चार हजार कोटी रुपये अडकल्यने, ठेवीदार मात्र अडचणी सापडले असून उपासपरीची वेळ आली आहे.तर काही ठेवीदारांना लग्न समारंभ,व्यवहार व दवाखान्यातील उपचारासाठी पैसे न मिळाल्याने आपले जीवन संपवले. ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे,अर्चना कुटे यांच्यासह सर्व संचालकावर ठेवीदाराचे पैसे हडप केल्या प्रकरणी बीड सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात फसवणूक व इतर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हे आर्थिक शाखेने द कुटे ग्रुप व ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बीड औरंगाबाद,पुणे,पैठण येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.तर सुरेश कुटे, आशिष पाटोदकर, कुलकर्णी यांना अटक करण्यात आलेली आहे. हा तपास छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.यामध्ये संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांची पत्नी अर्चना कुटे यांच्यावर देखील गुन्हा दाखल असल्याने त्यांचा शोध राज्यातील पोलिस घेत आहेत.अर्चना कुटे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथीलजामीन मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.या अर्जावर सुनावणी होऊन हा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील बांगर यांनी कामकाज पाहिले. तसेच तक्रारदाराच्या वतीने अॅड. प्रवीण बडे यांनी कामकाज पाहिले आहे.अर्चना कुटे याच मुख्य सूत्रधार असून यांना पोलिसांनी अटक केली तरच ठेवीदारांचे पैसे मिळणार असल्याचे ठेवेदारात चर्चा आहे.राज्यातील पोलीस हे अर्चना कुटेना जाणीवपूर्वक अटक करत नसल्याचा आरोप ठेवीदार करत आहेत.