ताज्या घडामोडी

क्षीरसागरानी बीड शहराचा उखंडा केला ! अशोक तावरे

मनसेचे सोमेश्वर कदम यांना प्रचंड मतदार विजयी करा...सुमंत धस

बीड / प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार सोमेश्वर राजकुमार कदम यांच्या प्रचारार्थ आज सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स सहयोग नगर येथे सभेचे आयोजित करण्यात आले होते, सदरील सभेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून,येणाऱ्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार सोमेश्वर कदम यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा असे सभेतून आवाहन करण्यात आले.

      विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात आज शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स,सुयोग नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सोमेश्वर राजकुमार कदम यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदरील सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस,जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे,शेतकरी सेना जिल्हाप्रमुख रामेश्वर साळुंखे, बीड शहर अध्यक्ष अमर जान,शहर उपाध्यक्ष विजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        गेल्या चाळीस वर्षापासून बीड नगरपालिका भारत भूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात असून नागरी सुविधा देणे तर दूरच राहिले परंतु बीड शहरातील नागरिकांना पाण्यासाठी,मूलभूत सुविधांसाठी, अगदी लाचार होण्याची वेळ क्षीरसागर यांनी आणली.पावसाळ्यामध्ये लोकांना आपल्या घराकडे जायला किंवा घरातून बाहेर पडायला रस्तेच नसतात.आपल्या जवळचा व्यक्ती असला तरच मुरूम टाकून रस्ता करून देण्याचे प्रकार क्षीरसागराच्या चिरंजीवांनी केलेले आहेत आज तेच आपल्यासमोर उमेदवार म्हणून आहेत परंतु त्यांच्या घड्याळाचा गजर केव्हाच बंद पडलेला आहे. असे सभेला संबोधित करताना मनसे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे म्हणाले.

          तरी येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी क्रमांक दोन वरील रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सोमेश्वर राजकुमार कदम यांनाच प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन मनसे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केले आहे. सदरील सभेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button