डॉ.ज्योतीताई मेटे झाल्या भावूक.
मेटे ताईंना शिवसंग्राम चे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांची खंबीर साथ.

बीड विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी आज प्रचार व भेटीवर दिला.बीड मतदार संघाला नवी दिशा देण्यासाठी, बीड शहराचा विकास करण्यासाठी डॉ.ज्योती मेटे विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. ज्योतीताई मेटे यांना आमदार करण्यासाठी शिवसंग्राम पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते डोअर टू डोअर प्रचार करत आहेत. ज्योतीताई मेटे या उच्चशिक्षित , उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या एक अनुभवी महिला आहेत. बीड मतदार संघ सत्ताधाऱ्यांनी अंधकारात लोटला आहे. विकासच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात मात्र ज्यांच्या हाती गेली अनेक वर्ष सत्ता आहे . त्यांनी बीडचा विकास का केला नाही. इथून मागे दिलेल्या संधी चे सोने करता आले नाही तर पुढे काय करणार आता मतदारांचा यांच्या आश्वासनावर विश्वास राहिला नाही. या करिता बीड मतदार संघातील मतदार आता आश्वासक चेहरा असलेल्या डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहेत. गाव खेड्यात डॉ. ज्योती मेटे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर शहरी भागातील सुजाण नागरिक देखील डॉ. ज्योती मेटे यांच्या सोबत आहेत. आज सकाळी बार्शी नाका येथून पदयात्रा ची सुरुवात करण्यात आली या रॅलीस हजारो नागरिकांनी, शिवसंग्राम पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या रॅलीची सांगता शिवसंग्राम भवन येथे झाली. शिवसंग्राम भवन मध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी ज्योतीताई मेटे या भाऊक झाल्या.