गेवराई करांनी खूप उपकार केले आहे
पुन्हा एका मायेचा हाथ पाठिशी ठेवा आमदार लक्ष्मण पवार यांचे भावनिक आवाहन

गेवराईकरांनी खूप उपकार केलेत..!
——————————
पुन्हा एकदा पाठीवर हात ठेवा – आमदार लक्ष्मण पवार यांची गेवराईकरांना भावनिक साद
———————————-
गेवराई दि. १८ (प्रतिनिधी) गेवराई च्या मातीशी इमान राखून पवार घराण्यांनी काम केले आहे. आम्ही गेवराई ला आई मानले. जाती पातीच्या पलीकडे जाऊन, आई रूपी गेवराई ची सेवा केली. आम्ही उपकार केले नाहीत. उलट गेवराई शहरातील नागरीकांनी आम्हाला जीवापाड प्रेम दिलय. उद्याच्या निवडणुकीत तुमच्या मदतीचे गरज असून, तुमचा हात माझ्या पाठीवर ठेवून, रिक्षाला ताकद द्या, असे भावनिक आवाहन आमदार लक्ष्मण पवार यांनी सोमवार ता. 18 रोजी गेवराई शहरातील नागरीकांना केले आहे. अपक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण पवार यांनी शहरातील व्यापार पेठेत जाऊन नागरीकांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांनी भावनिक साद घालत, रिक्षा विधानसभेत पाठवण्याची विनंती मतदारांना केली आहे.गेवराई विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा आमदार लक्ष्मण माधवराव पवार यांनी सोमवार ता. 18 रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हेर रोड येथील कार्यालया पासून प्रचार फेरी काढून व्यापारी पेठेत जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्याशास्त्री चौक, मेन रोड, तहसील रोड, पंचायत समिती रस्ता, ताकडगाव रोडच्या परिसरात असलेल्या व्यापारी वर्गाशी संवाद साधून, ऑटो रिक्षा ला मतदान करण्याचे आवाहन केले. शहरातील व्यापार पेठेत शांततामय वातावरण निर्माण करण्याला या पुढे प्रयत्न राहणार आहेत. व्यापार पेठे मोठी व्हावी, आर्थिक उलाढाल व्हावी म्हणून आणखी काम करणार असल्याचे जाहीर वचन , यावेळी आमदार पवार यांनी नागरीकांना दिले आहे. आमदार पवार यांनी काढलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनीचांगला प्रतिसाद देऊन, सहकार्य करण्याचे वचन दिल्याने, गेवराई शहर आमदार लक्ष्मण पवार यांचा बालेकिल्ला म्हणून सिद्ध होईल, अशी चर्चा होऊ लागली असून, मेन रोडच्या परिसरात आ. पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. एकुणच गेवराई शहराशी आ.लक्ष्मण पवार यांच्या घराण्यावर सर्व जाती धर्मातील जनतेचा विश्वास असून, त्या विश्वासाला आ. पवार जागले आहेत. त्यामुळेच, गेल्या दिवसांपासून आ. पवारांनी शहरातील विविध भागात काॅर्नर सभांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान , गेवराई च्या मातीशी इमान राखून पवार घराण्यांनी काम केले आहे. आम्ही गेवराई ला आई मानले. जाती पातीच्या पलीकडे जाऊन, आई रूपी गेवराई ची सेवा केली. आम्ही उपकार केले नाहीत. उलट, गेवराई शहरातील नागरीकांनी आम्हाला जीवापाड जपले आहे. उद्याच्या निवडणुकीत तुमच्या मदतीचे गरज असून, तुमचा हात माझ्या पाठीवर ठेवून, रिक्षाला ताकद द्या, असे भावनिक आवाहन आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई शहरातील नागरीकांना केले आहे.