योगेश भैयाच्या कार्यकर्त्याचा अनिल दादांना पाठिंबा !
बार्शी नाका भागातील शेकडो तरुण अनिल दादा सोबत.

बार्शी नाका,ढगे कॉलनी,अशोक नगर भागातील मतदार अनिल दादाच्या खंबीरपणे पाठीशी.
योगेश क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादीला खिंडार.
बीड बार्शी नाका भागतील योगेश भैयाच्या कार्यकर्त्यांनी अनिल दादाला पाठिंबा दिल्याने अनिल दादाचा किल्ला नक्कीच मजबूत झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बीड विधानसभेचे अपक्ष उमेदवार अनिल दादा जगताप यांना बार्शी नाका भागातील नागरिकांनी पाठिंबा दिला असून, दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन दिले. युवकांचे हृदयस्थान व मार्गदर्शक स्वप्निल भैया गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल दादा जगताप यांना बार्शी नाका अशोक नगर ढगे कॉलनी मधून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला.बार्शी नाका भागातील युवा नेते बबलू गलधर यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा देऊन अनिल दादा जगताप यांना प्रचंड मताने निवडून आणणार असल्याचा ठाम विश्वास अमोल(बबलू )गलधर यांनी व्यक्त केला.यावेळी स्वप्निल गलधर,गजानन भाऊ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी नाका ढगे कॉलनी भागतील बाळासाहेब काकडे,महादेव लांडगे,अंकुश गलधर, जयदीप ढोले, रतन गलधर,रोहन घोडके,दिनेश वडमारे, अनिकेत हजारे, महादेव शिंदे,विकास गलधर, अशोक शिंदे, संकेत वाणी,रामेश्वर गोरे,गणेश शेळके, गणेश सुरवसे, जीवन थिटे, गणेश गलधर,कौतुक गलधर, दत्ता जगताप ,बबलू भांडवले ,निलेश गलधर, रामेश्वर देवाडे,कल्याण जाधव, हर्षद भांडवले, नंदू इंगोले ,शिवा डेंगे ,रामेश्वर निर्धार, निखिल कदम ,सुभाष सुरवसे, दिलीप वाघमारे, प्रमोद दुनघव, अजय गलधर , सह सर्व मित्र परिवार महिला उपस्थित होत्या.