ताज्या घडामोडी
परिवर्तन अटळ,सेवेची संधी द्या…अनिल दादा जगताप
घराणेशाही मोडीत काढत,शहराचा वाटूळ करणाऱ्या क्षीरसागरना घरी बसवा.

वीडदि.१८ (प्रतिनिधी):- बीड मतदार संघातील जनतेने आता परिवर्तन करुन आणण्याची वेळ आली आहे. आता परिवर्तन केले नाही तर पुढचे पाच वर्ष पश्चाताप करण्याची वेळ येईल. येत्या २० तारखेला शिलाई मशीन समोरील बटन दाबून मला मतदार संघात काम करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन अपक्ष उमेदवार अनिल जगतापयांनी केले आहे. ते म्हणाले की, बीडमतदार संघाचा विकास झाला नाही, शहरात आणि ग्रामीण भागात सारखीच परिस्थिती आहे. सर्वसामान्य कुटुंबातून मी उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहे. कुठला पक्ष माझ्या मागे नाही, कुठला नेता माझ्या मागे नाही, परंतु ३९ वर्षाच्या समाज सेवेचे बळ लक्षात घेऊन बीडमतदार संघातील जनता माझ्या पाठिमागे उभी राहील. क्षीरसागरांनाबीड मतदार संघातून हद्दपार करण्यासाठी मला सेवेची संधी द्यावी असे आवाहन अनिल जगताप यांनी केले आहे.