जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या अनिल दादांना विजयी करा…गवते
बीड शहर सह ग्रामीण भागातील मतदार अनिल दादा सोबत

बीड, प्रतिनिधी- आजवर बीडच्या सत्ताधाऱ्यांनी थापा मारण्याशिवाय काहीच केलं नाही. एकाही गावाखेड्यात रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गावागावात बंधारे बांधून देतो त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटेल अशी पोकळ आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात गावात कधी चक्कर मारली नाही. शेतकरी कुठल्या अडचणीत आहेत हे कधी विचारले नाही. शेतकऱ्यांना मुबलक पाणी वीज नसल्यामुळे शेती करता येत नाही. शेत मालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करून बसतो आणि त्याचे कुटुंब रस्त्यावर येते. अनिलदादा जगताप यांच्याकडे सत्ता नसताना देखील त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत त्यांना आधार दिला आहे. अनिलदादा यांनी पक्षाचा राजीनामा देऊन जरांगे पाटील हाच माझा पक्ष आणि जनता हाच माझा नेता असे स्पष्ट केले आहे. अनिलदादांचा आता एकच पक्ष आहे संघर्षयोद्धा मा. मनोजदादा जरांगे पाटील. यामुळे 20 नोव्हेंबर रोजी बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा माणिकराव जगताप यांना मतदान करण्यासाठी ईव्हिएम मशीनवरील अनुक्रमांक 13 निशाणी शिवण यंत्र यावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आणि अनिलदादांना अंतरवली सराठी येथे सन्मानीय मनोजदादांचे आशीर्वाद घ्यायला पाठवा असे आवाहन मराठा सेवक बळीराम गवते यांनी बीड मतदार संघातील जनतेला केले आहे.