ताज्या घडामोडी
आष्टी मतदार संघात कमळ विजयाच्या वाटेवर
माजी मंत्री सुरेश धस यांच्या कामाची पावती सर्वसामान्य जनता मतदानरुपी देणार

आष्टी: प्रतिनिधी
मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून माजी मंत्री सुरेश धस जनतेच्या कामाला पडत असून सर्वसामान्य जनता आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिली असल्याचे चित्र जाणवत आहे विरोधकांना चारी मुंड्या शेतकऱ्यात सुरेश धस यांनी प्रचारातही आघाडी घेतल्याने कमळ विजयाच्या वाटेवर असल्याचे दिसुन येत आहे.
२३१ आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी,शिवसेना,रिपाई (आठवले गट,व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश रामचंद्र धस याच अनुक्रम ३ असून चिन्ह कमळ आहे.जातीपातीचं राजकारण न करता माणुसकी हीच जात आणि धर्म समजून राजकीय प्रवास करीत आहेत.आजवर मोठ्या प्रमाणावर विकासकामाच्या माध्यमातून मतदारसंघात गंगा आणली आहे.तसेच कोरोना काळात स्वताचा जीव धोक्यात घालून हजारो रूग्णाचे जीव वाचवले,व अनेकांना धीर देऊन मानसिक आधार दिला.तर तालुक्यात नरभक्षक बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली होती.यावेळी वनविभागाच्या दिमतीला राहून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याचा खत्मा करे पर्यंत त्यानी हार मानली नाही.अडीअडचणीत, सुखादुखात हाडाचे काड अन् रक्ताच पाणी करून जनसेवेचा वसा घेतलेले आमदार सुरेश धस यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाढता पाठिंबा मिळत असून आष्टी मतदार संघात कमळ विजयाच्या वाटेवर असून
माजी मंत्री सुरेश धस यांच्या कामाची पावती सर्वसामान्य जनता मतदानरुपी आशिर्वाद देणार आहे.यात कसलीच शंका नसल्याचे बोलले जात आहे.