ताज्या घडामोडी
परळीत मतदान केंद्रात कॅमेरे बंद असल्याने राडा!
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कॅमेरे सुरू केले.

महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात आज मतदान असल्याने सकाळपासून नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. बीड जिल्ह्यातील परळी हा मतदारसंघ संवेदनशील असल्याने परळी तालुक्यातील सर्वच मतदान केंद्राबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परळीतील मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने आक्षेप घेत मतदान केंद्रामध्येच राडा सुरू झाला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून मतदान केंद्रात जावून कॅमेरे सुरू करण्यात आले. मात्र कॅमेरा बंद करून बोगस मतदान केले असल्याचा आरोप करण्यात आला.पोलीस व निवडणूक कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले. कॅमेरा बंद करण्यामागील हेतू काय होता हे परळी मतदारसंघातील उमेदवाराला व कार्यकर्त्यांना लक्षात येतात त्यांनी राडा घातला होता.