परळी माधव जाधव यांना मारहाण !
मतदान केंद्राबाहेर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये,शहरात शांततेत मतदान सुरू असून,मात्र काही मतदान केंद्रावर मारहान करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आज सकाळीच परळी तालुक्यातील धर्मपुरी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून बोगस मतदान केल्याचा व्हिडिओ समोर आला होता, त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्रपट गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांनी स्वतः केंद्रामध्ये जाऊन निवडणूक अधिकाऱ्याला पोलिसा समक्ष जाब विचारला व सीसीटीव्ही व्हिडिओ चालू करण्यास भाग पाडले. त्यानंतर परळी शहरात बँक कॉलनी परिसरातील एका मतदान केंद्रावर धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड यांनी राजसाहेब देशमुख यांचे सहकारी माधव जाधव यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमात वायरल झाला असून यामुळे मतदान केंद्रात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.बीड जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पाडले जात असून फक्त परळी शहर व ग्रामीण भागात सकाळपासूनच राडा होत असल्याचे चित्र समोर येत आहे.