ताज्या घडामोडी
आष्टी मध्ये तुफान राडा,कार्यकर्त्यात बेदम हाणामारी !
सुरेश धस व महेबुब शेखचे समर्थक एकमेकांना भिडले.

बीड विधानसभा निवडणूक मतदान करण्यासाठी आज सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या.बीड जिल्ह्यात काही मतदान केंद्रावर हाणामारीच्या घटना घडल्या तर घाटनांदुर मतदान केंद्रामध्ये EVM मशीनची तोडफोड करून बॅलेट पेपर फेकून देण्यात आले,त्यामुळे घाटनांदुर मध्ये तनावाची स्थिती निर्माण झाली होती. तसंच प्रकार आष्टी तालुक्यातील बेदरवाडी गावातील मतदान केंद्रा बाहेर सुरेश धस व महेबूब शेख समर्थक शिवीगाळ करत एकमेकांना भिडले, लाट्या काट्यानी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल झाला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली.