ताज्या घडामोडी

बीड मध्ये फेरमतदान होणार ?

विधानसभा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने फेर मतदान होण्याची शक्यता.

 बीड विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून येतो आहे.मात्र मतदान सुरू असतानाचा मतदान केंद्रावर बाळासाहेब शिंदे या उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.बीड विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत होते. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर ते थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. शिंदे यांना शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मतदानापूर्वीच एखाद्या उमेदवाराचा मृत्यू होणे मतदानाची प्रक्रिया सुरू असतांना निवडणुकीतील एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास मागील कायद्यातील (लोक प्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम ५२) तरतुदींमध्ये आता नव्यानेच लोक प्रतिनिधित्व (सुधारणा) अधिनियम, १९९६ अन्वये उल्लेखनीय बदल करण्यात आले आहेत. अधिनियमातील कलम ५२ च्या सुधारणे अन्वये कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा खालील नमूद परिस्थितीत मृत्यू झाल्यास मतदान स्थगित केले जाईल :-(क) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या दिवशी सकाळी ११-०० वाजेनंतर कोणत्याही वेळी उमेदवाराचा मृत्यू झाला आणि त्याचे/तिचे नामनिर्देशन पत्र कलम ३६ अन्वये छाननी प्रक्रियेत वैध ठरविण्यात आल्यास, किंवा(ख) कलम ३६ अन्वये त्याचे/तिचे नामनिर्देशन पत्र छाननी प्रक्रियेत वैध ठरले आहे आणि कलम ३७ अन्वये त्याने / तिने आपले निवडणुकीतील उमेदवारीची माघार घेतली नाही आणि त्याचा/तिच्या यादरम्यान मृत्यू झाल्यास, आणि कोणत्याही प्रकरणान्वये कलम ३८ अन्वये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची सूची यादी प्रकाशित होण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्याचा/तीचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास; किंवा(ग) निवडणूक लढविणारे उमेदवार म्हणून त्याचा/तिचा मृत्यू झाल्यास आणि मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्याच्या मृत्यूचा अहवाल प्राप्त झाल्यास.१३.५९.२. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे असलेल्या वास्तविक परिस्थितिनुसार उमेदवाराच्या मृत्युसंबंधी पूर्ण समाधान झाल्यास निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान स्थगित करण्याचे आदेश देतील, ज्याची अधिसूचना निवडणूक आयोग यानंतर प्रकाशित करेल. याबाबतीत वास्तविक परिस्थितीची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तात्काळ निवडणूक आयोगास कळवतील आणि विनियोजित प्राधिकरणास म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारत सरकारच्या विधि, न्याय व कंपनी कार्य मंत्रालयास आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारला याची माहिती दिली जाईल.१३.५९.३. उपरोक्त (क) मध्ये नमुद केल्यानुसार कोणत्याही उमेदवाराचा मृत्यू झाल्यास अशा स्थितीत मृत उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रासह सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदान स्थगित करण्याचा आदेश दिला जाईल. अशा प्रकरणांमध्ये नोंद घेतली जाईल की उमेदवार हा मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा आहे हे तेव्हाच मान्य केले जाईल जेव्हा उमेदवाराचा मृत्यू होण्यापर्यंत निवडणूक चिन्ह (राखून ठेवणे व वाटप करणे) आदेश, १९६८ च्या परिच्छेद १३ मध्ये उल्लेख केलेल्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केली आहे. राजकीय पक्षाने उमेदवाराच्या मृत्यूच्या वेळेपर्यंत विहित नमुन्यातील अ’ आणि’ व’ नमुना पत्र याद्वारे उमेदवार हा राजकीय पक्षाकडून उभा असल्याच्या बाबतीत सूचित करत नाहीत तोपर्यंत उमेदवार मतदान स्थगित करण्याच्या प्रयोजनार्थ मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून उभा असल्याचे मानले जाणार नाही. त्यामुळे बीड विधानसभा निवडणुकित फेर मतदान होणार? का हे पहावे लागणार.

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button