शिवसेना जिल्हाप्रमुखपदी स्वप्निल गलधर यांची निवड !
आष्टी,पाटोदा व गेवराई ची जबाबदारी.

बीड दि.२१ (प्रतिनिधी):- भाजपचे एकेकाळचे सक्रिय नेते तथा मराठा आंदोलक म्हणून गेल्या काही महिन्यात सुपरीचित झालेल्या स्वप्निल गलधर यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली. त्यांच्याकडे आष्टी पाटोदा व गेवराई ची जबाबदारी देण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे बाजीराव चव्हाण हे उपस्थित होते. स्वप्निल गलधर हे एकेकाळी भाजपा नेत्या पंकजाताई मुंडेयांचे विश्वासू सहकारी होते तर लिंबागणेश या मोठ्या गावच्या सरपंचपदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाजपाचे काम थांबवून पूर्ण वेळ मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यासोबत सक्रियपणे कार्य केले कार्य करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र मनोज जरांगे यांच्या आदेशानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला होता. आता ते शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कसे कार्य करतात हे पाहणे औत्सुक्याचे वीड जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील गलघर यांची निवड करून त्यांना नियुक्तीचे पत्र देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. समवेत दुसरे जिल्हाप्रमुख ठरणार आहे. त्यांच्या निवडीचे बीड शहर आणि जिल्ह्यात स्वागत करण्यात आले आहे. स्वप्निल गलधर यांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनीत्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व आरोग्य दूत बाजीराव चव्हाण उपस्थित होते. स्वप्निल गलधर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याने कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण पसरले बार्शी नाका चौकामध्ये फटाक्याची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले.