ताज्या घडामोडी

मतमोजणी बंदोबस्तसाठी बीड पोलीस प्रशासन सज्ज !

मतमोजणीची पूर्वतयारी,बीड जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त.

बीड(प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणूक मध्ये काही मतदान केंद्रावर अनुसूचित प्रकार वगळता शांततेत पार पडली. बीड विधानसभा मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होणार आहे, मतमोजणीची पूर्व तयारी,तसेच र्कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये त्या करीता पोलीस प्रशासन सज्ज झाले असून बीड शहरात पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान स्टॉकिंग फोर्स BSF चे जवान यांनी आज सायंकाळी 5 वाजता शहरात पोलीस रूटमार्च काढण्यात आला. या पतसंचलनाची सुरुवात बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण पासून काण्यात आली.कारंजा रोड,बलभीम चौक, माळवेस, डॉ.आंबेडकर पुतळा,मोमिनपुरा,बार्शी नाका येथे करण्यात आले.है पतसंचलन बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक विश्वंभर विश्वरभर गोल्डे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंटेवाड,पेठ बीड पोलीस ठाणे निरीक्षक अशोक मोदीराज, शिवाजी नगर पोलीस ठाणे निरीक्षक खेडकर, वाहतूक पोलीस निरीक्षक सानप, यासह राज्य राखीव दल, BSF जवाणची तुकडी व पोलीस  अधिकारी,कर्मचारी यांनी पथसंचलन करत या पतसंचलनाने बीड शहरवासीयाचे लक्ष वेधले होते.

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button