संदीप भैयांच्या विरोधात काम का केले म्हणत तलवारीने वार !
गजानन क्षीरसागर सर पाच जनविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव – अमर नाईकवाडे
निलेश कवठेकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर आ. संदीप क्षीरसागर हे माझ्या विरोधात हाफ मर्डर व अॅट्रॉसिटीची खोटीतक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.
बीड प्रतिनिधी : बीड विधानसभा राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीपभैय्यांच्या विरोधात काम का केलेस म्हणत तलवारीने हल्ला करत तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पेठ बीड हद्दीत घडली. या प्रकरणी गजानन क्षीरसागरासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश उर्फ विकी महादेव कवठेकर (रा. रंगार गल्ली, पेठबीड बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गजानन उर्फ सुमारास राजु रविंद्र क्षीरसागर, गणेश नरेश जाधव, अक्षय चांगुजी लोंढे व इतर दोघांनी दुचाकीवर घरासमोर येऊन संदीपभैय्या विरोधात काम का केले म्हणत शिवीगाळ केली. याची माहिती पोलीसांना दिल्यानंतर निघून गेले. त्यानंतर पुन्हा रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभा असताना पुन्हा तू संदीपभैय्यांच्या विरोधात काम का केलेस, तुला आता जिवंत ठवेत नाही असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने गजानन क्षीरसागरने तलवारीने वार केला, हा वार चुकवून मी घरामध्ये पळून गेलो. या प्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात वरील पाच जणांवर बीएनएस १०९, १८९ (२), १९१ (२),१९१ (३), १९०, ३५२, ३५१ (२), आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पेठ बीड पोलिस करत आहेत.