ताज्या घडामोडी
18 व्या फेरी अखेरीस संदीप क्षीरसागर आघाडीवर.!
पहिल्या फेरीपासून योगेश क्षीरसागर आघाडीवर होते,15 व्या फेरीला लीड तुटली.

बीड विधानसभा निवडणुकीची मतदान मोजणीची प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली. महायुतीचे उमेदवार पहिल्या फेरीपासूनच योगेश क्षीरसागर हे आघाडीवर होते, परंतु पंधराव्या फेरी अखेरीस बीड शहरामध्ये संदीप क्षीरसागर यांनी दहा हजाराच्या पुढे मते घेऊन योगेश क्षीरसागर यांची लीड तोडली. बीड शहरातील मतमोजणी संपली असून 18 व्या फेरीपासून ग्रामीण भागाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आठव्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर यांना 67015 मत पडली तर डॉ. योगेश क्षीरसागर यांना 58816 मत मिळाली असून 18 व्या फेरी अखेरीस संदीप क्षीरसागर हेच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील आणखी दहा फेऱ्याचे मत येणे बाकी असून यामध्ये मतदारांनी कोणाला पसंडी दिली है स्पष्ट काही तासातच होणार आहे.