
बीड विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळ-जवळ स्पष्ट झाला असून महाराष्ट्रात सर्वात जास्त मते हे बीड मतदार संघातील परळी येथील धनंजय मुंडे यांना एक लाखाच्या वर मते पडली असेल विजय निश्चित झाला आहे. तर आष्टी मधून सुरेश धस यांनी 50 हजाराच्या पुढे मते घेतल्याने यांचा विजय निश्चित मानला जात आहे, गेवराई मध्ये विजयसिंह पंडित हे विजयाच्या मार्गाकडे आहेत. माजलगाव मध्ये चुरशीची लढत असून मोहन जगताप हे 2960 मतांनी पुढे आहेत. तर केज मतदारसंघातून नमिता मुंदडा व साठे यात काट्याची टक्कर होत असून नमिता मुंदडा या 3000 मताने पुढे आहेत. बीडमध्ये 9300 मतांनी संदीप क्षीरसागर पुढे असून केस बीड व माजलगाव मध्ये काट्याची टक्कर होणार असल्याची दिसत आहे. खूप कमी फरकाने या तिन्ही मतदारसंघामधला उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज आहे. काही तासातच चित्र स्पष्ट होणार असून महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एक नंबरचे स्थान मिळाले आहे.