निवडून येताच संदीप क्षीरसागरांनी घेतली जरांगे पाटलांची भेट !
बीड शहरातील मतदारांनी संदीप क्षीरसागर यांना तारले.

बीड. बीड विधानसभेच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण होते का यामुळे धनंजय मुंडे सह दिग्गजाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. धानसभेचा निकाल धक्कादायक लागला असून एक लाखाहून अधिक सर्वाधिक मताधिक्य धनंजय मुंडे यांना मिळाले, आष्टीचे सुरेश धस पन्नास हजाराच्या वर मत घेऊन विजय झाले, गेवराईची विजयसिंह पंडित यांना 35000 च्या वर मत पडली तर माजलगाव, केज, बीड मतदारसंघात पाच ते दहा हजाराच्या फरकाने उमेदवार विजयी झाले. त्यामुळे बीड जिल्हा मतदार संघातिल निवडणुकी चुरशीची झाली होती, नेत्याकडून,कार्यकर्त्याकडून व मतदाराकडून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. बीड मतदार संघामध्ये तर भावा विरुद्ध भाऊ अशी लढत झाली, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केल्याने योगेश क्षीरसागर यांचे पाठबळ वाढले होते, त्यामुळे योगेश क्षीरसागर यांचा एक हाती विजय होईल असा अंदाज सर्वांना वाटत होता, परंतु मोठे भाऊ विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी लहान भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर यांचा 5468 मताने पराभव करत महाविकास आघाडीचा गड राखण्यात यश आले. त्यामुळे बीड मतदार संघात सहापैकी पाच उमेदवार महायुतीचे तर एक महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे निवडून येतात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.