पोलिस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू ! पोलीस दलात हळूहळू
रात्री पेट्रोलिंग करत असताना पुलाजवळील खड्ड्यात पडल्याने मृत्यू.

बीड.बीड नगर रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने सर्वत्र धूळ दिसून येते त्यामुळे प्रवासी व नागरिक यांना प्रवास करताना धुळीमुळे समोरील काही दिसत शिरूर कासार येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली.बीड-पाथर्डी रस्त्यावर नवगण राजुरी जवळ घडली.पुलाच्या काम सुरू असलेल्या पुलाजवळ खड्ड्यात पडल्याने मार लागून मृत्यू झाला. पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली असता त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दखल करण्यात आले. अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच नाव सुभाष अजिनाथ तेलप ( वय ५५ वर्ष) रा. धांडेनगर, बीड हे शिरूर (का) पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते रात्री दुचाकीवरून पेट्रोलिंग करत होते. रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास बीड-पाथर्डी रस्त्यावर नवघन रजुरी पुलाजवळ तेलप यांना अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठी मागून धडक दिली. यानंतर दुचाकी पुलाच्या खड्ड्यात पडली, यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेने बीड पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली आहे.