आ.सुरेश धस यांचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकले !
सुरेश धस यांना पालकमंत्री पद द्यावे. संभाजी सुर्वे

महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपचे 132 जागेवर उमेदवार विजयी झाल्याने मतदारांनी भाजपलाच झुकते माप दिल्याचे दिसत आहे. बीड मतदार संघात महायुतीचे सहापैकी पाच मतदारसंघातील उमेदवार विजय झाले असून परळी मध्ये धनंजय मुंडे यांना एक लाख चाळीस हजार एवढे प्रचंड मताधिक्याने विजय झाला,तर आष्टी मतदार संघात भाजपचे उमेदवार असलेले सुरेश धस यांनी पन्नास हजाराच्या वर मत मिळाली असून घवघवीत यश प्राप्त झाले. त्यामुळे बीड व आष्टी मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सुरेश धस यांचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले असून बीडचे पालकमंत्री सुरेश धस होणार का? हे मात्र येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.
आ.सुरेश धस यांना पालकमंत्री पद द्यावे… संभाजी सुर्वे
राज्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीला पहिली पसंती दिली आहे. त्या नुसार बीड जिल्ह्यात भाजपाचा उच्चांक शंबर टक्के आहे. आणि राष्ट्रवादीचा पंचाहत्तर टक्के आहे. म्हणून बीड जिल्ह्यात भाजपाचा पालकमंत्री व्हावा अशी माझ्या सह पक्षाच्या जन सामन्यातील असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे. ती आम्ही व्यक्त केली आहे. कारण बीड जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. व सुरेश धस यांना कामाचा अनुभव असल्याने सुरेश धस यांचा विचार करून पक्षाने निर्णय घेऊन बीडचे पालकमंत्री पद सुरेश धस यांना देण्यात यावे अशी माझ्यासह असं के भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यानी भाजप पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.