
बीड : मागील एक महिन्यामध्ये बीड शहरांमध्ये हा तिसरा खून असून, आठ दिवसापूर्वी मोंढा रोड कडे असणाऱ्या बिंदुसरा रस्त्याला लगत डोक्यात दगड घालून खून झाला होता तर पेठ बीड भागातील सुभाष कॉलनी मध्ये डोक्यात दगड घालून जाधव नाव व्यक्तीचा खून करण्यात आला होता,दिनाक २४ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील पांगरी रोडवर रात्री एका तरूणाला बेदम मारहाण करून सौभाग्य लॉन्स जवळील दुकानाजवळ टाकून दिल्याची प्राथमिक स्वरूपात माहिती मिळत आहे.याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली असता शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. डॉक्टरांनी तपासून सदरील तरूण मयत झाल्याचे सांगण्यात आले.या तरुणाच्या हातावर संगीताचे नाव गोंदलेले असून अंदाजे वय २७ ,वर्ष असून, त्याच्या अंगावर निळ्या रंगाच्या शर्ट आहे. त्याच्याजवळ ओळख पटण्यासारखा एकही पुरावा सापडला नसल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सदरील मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी केले आहे.