मुख्यमंत्र्याचा शपथविधी लांबला !
मुख्यमंत्र्यांसह आमदाराचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होण्याची शक्यता.

महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल लागल्याने मुख्यमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले असल्याने भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. उद्या 25 नोव्हेंबर रोजी होणारा शपथविधी सोहळा लांबला असल्याची माहिती मिळत असून 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्याच्या नाव जाहीर होणार आहे.राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीने दमदार कामगिरी केली आहे. त्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजपा राज्यातील नंबर एकचा पक्ष बनला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने १३२ जागा जिंकल्या असून आता मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घ्यावे अशी मागणी भाजपा आमदारांकडून सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत आज भाजपाच्या वरिष्ठांची बैठक होणार आहे. त्यात फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडवणीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी लावून धरण्यात येत आहे. मात्र महायुतीत अद्याप मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही असं समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसयांच्या मुख्यमंत्रिपदाला आमचा पाठिंबा आहे असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कायम राहावे अशी शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे. भाजपाने या निवडणुकीत १३२, शिवसेनेने ५७ आणि राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, त्याचा आनंद भाजपा कार्यकर्त्यांसह जनतेला होईल. उद्या होणारे शपथविधी सोहळा 29 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.