
बीड महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, भाजपने जोरदार मुसंडी घेत 132 जागेवर विजय मिळवून नवा इतिहास घडवला.बीड मतदारसंघांमध्ये आमदार कोण होईल याची याची उत्सुकता जनतेला होती. मतमोजणी नंतर आमदारांची निवड झाली. यामुळे आता मंत्री कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. यासाठी धनंजय मुंढे, पंकजा मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळके, नमिता मुंदडा यांची नावे चर्चेत आहेत. यामुळे आता मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता लागली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी पूर्ण झाली आहे. राज्यातील २८८ आमदारांवर शिक्कामोर्तब झाले. राज्यात अत्यंत चुरशीची निवडणूक होईल तसेच स्पष्ट बहुमत कोणालाही मिळणार नाही असा अंदाज होता. यामुळे युती, आघाडी दोघांनीही अपक्ष उमेदवारांशी निकाल लागण्या आधीच संपर्क सुरु केले होते. पण शनिवारी (दि.२३) मतमोजणीत राज्यात मतदारांनी एकहाती महायुतीला कौल दिला. महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला, मतमोजणी पर्यंत सर्वांना आमदार कोण? याची चर्चा सुरू होती. परंतु निकाल घोषित झाल्यानंतर आता मंत्री कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्य मिळवले म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच पंकजा मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि नमिता हे विजयी उमेदवार पैकी मंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे काही दिवसात स्पष्ट होईल.