ताज्या घडामोडी

आ.सुरेश धस यांचा पुतळा जाळल्याने आष्टी बंदचा इशारा..

आरोपीला तात्काळ अटक करा..धस समर्थकाची मागणी.

महाराष्ट्रातील विधानसभा निकाल जाहीर झाले असून भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाले. बीड जिल्ह्यातिल मतदारसंघांमध्ये भाजपचे आष्टी मतदारसंघातील सुरेश धस हे प्रचंड मतांनी विजय झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आष्टीच्या विजयी सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आष्टी मध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना पाण्यासाठी आपल्या समर्थकाला आदेश दिले होते, धस यांना मतदान करू नका, धोंडे यांना मदत करा असा मुंडे समर्थक असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे धस-मुंडे समर्थकांत नवा वाद उफाळलाआहे. शिरूर तालुक्यातील सावरगावचकला, राळेसांगवीत आमदार सुरेश धसयांचा प्रतीकात्मक पुतळा मुंडे समर्थकांनी जाळल्याची घटना घडली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाटोदा येथील धस समर्थकांनी पाटोदा पोलिसांना निवेदन दिले. तर, धस यांचा काही समाजकंटकांनी अश्लील भाषेतील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आष्टी येथील धस समर्थकांनी थेट आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेऊन २४ तासांत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणीलावून धरत आष्टी बंदचा इशारा दिलाआहे. आमदार सुरेश धस हे आष्टी येथील सभेत आमदार पंकजा मुंडे यांच्या विरोधात बोलल्यानंतर काही समाजकंटकांनी अश्लील समर्थकांनी एकत्र येत पाटोदा पोलिस व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.सावरगाव चकला येथे १२ व्यक्तींनी एकत्र येऊन आमदार धस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळत अर्वाच्य भाषेत बदनामीकारक वक्तव्य केले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जब्बार पठाण,पद्माकर घुमरे, सय्यद शहानवाज, सोमीनाथ कोल्हे, प्रकाश जावळे, रामेश्वर जाधव,रोहिदास गिते, महादेव जाधव, दत्तात्रय साठे यांनी केली. आष्टी येथील पोलिस ठाण्यात धाव घेऊन २४ तासांच्या आत आरोपींवर गुन्हे दाखल करून अटकेची मागणी केली. अन्यथा आष्टी शहरात बंद पाळला जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या वेळी समर्थकांनी सुरेश धस जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. आमदार धस यांच्या भाषणाचा राजकीय द्वेषापोटी विपर्यास केला जात असल्याचा आरोपही आष्टीतील समर्थकांनी केला आहे. सुरेश यांचा पुतळा जाळणाऱ्याला  पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी धस समर्थकांनी केली. आष्टी मध्ये मुंडे विरुद्ध धस असा सामना येत्या काही काळात पहावयास मिळणार असल्याची चित्र दिसत आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button