मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा ! मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी मध्ये महायुतीला मोठे यश प्राप्त होऊन, एक इतिहास घडवला आहे. तब्बल 132 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस असणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून स्पष्टता आली नसली तरी भाजपचे वरिष्ठ नेते या बाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राजभावनात पोहोचले असून शिंदे यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे. दरम्यान, शिंदे यांच्या एका पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे. शिंदे यांनी आपल्या समर्थकांना निवासस्थानाबाहेर जल्लोष करू नये, असे आवाहन केले आहे. महायुतीच्या विजयानंतर फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेनेकडूनही शिंदे यांचे नाव पुढे केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्रीम्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसेआणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय देतील तो मान्यराहील असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या मोठ्याविजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार स्थापन होईल,असे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी केलेल्या पोस्टमध्येम्हटलं होतं. महाआघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि आजही सोबत आहोत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ व र्षाबांगल्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एकत्र येऊ नये, असे आवाहन शिंदे यांनी केले होते. त्यामुळे ते पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांना दिला आहे. मुख्यमंत्री कोण? हे येत्या दोन दिवसा स्पष्ट होणार असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार अशी विश्वसनी सुत्राकडून माहिती मिळत आहे.