बीड शहरासाठी आमदारांनी कोणत्या योजना आणल्या ?
डॉ.योगेश क्षीरसागरांनी कार्यकर्ते,जनतेशी संवाद साधला.

बीड प्रतिनिधी बीड विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांचा अल्पमताने पराभव झाला. पहिल्या फेरीपासूनच योगेश क्षीरसागर यांना चांगली लीड भेटली होती परंतु बीड शहरातील मतमोजणीला सुरुवात होताच विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी आघाडी घेतली होती. दोन्ही उमेदवारांमध्ये दहा हजाराच्या जवळपास मतांचा फरक होता. अखेरचे फेरीस डॉ. योगेश शिरसागर यांचा पाच हजाराच्या जवळपास मताने पराभव झाला. निकाल लागून तीन दिवस झाले की लगेच डॉ. योगेश शिरसागर हे जनतेमध्ये, कार्यकर्त्यामध्ये येऊन अडीअडचणी जाणून घेत आहेत. सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात जास्तीत जास्त कामे करून घेणे हे माझ्यासाठी आव्हान राहणार असून ते पेलणार आहे असा निर्धार करत येणाऱ्या नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढू, जनतेत जाऊ पुन्हा लढू अन् पुन्हा जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केला.यावेळी बोलताना डॉ योगेश क्षीरसागर म्हणाले की मताचे ध्रुवीकरण झाले, पण हे फार काळ टिकत नसते . महायुतीचा घटक म्हणून येणाऱ्या पाच वर्षात चांगल काम करून दाखवु असा शब्द देखील डॉ योगेश क्षीरसागर यांनी दिला. तर नवनिर्वाचित आमदाराला बीडच्या जनतेने एक लाख मते देऊन निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांचेही कर्तव्य आहे त्यांनी जनतेसमोर येऊन विकासाचा प्लॅन मांडावा असे आवाहन डॉ सारिका क्षीरसागर यांनी विद्यमान आमदाराला दिले आहे. प्रत्येक वेळी विकासाचा मुद्दा आला की आम्ही समोर येतो, कारणआम्ही विकास कामे केली आहेत म्हणून आम्ही आत्मविश्वासाने मीडिया समोर येतोत. परंतु जो लोकप्रतिनिधी काहीही न करता तुम्ही निवडून दिला आहे, त्यांचे काम मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येणे आवश्यक असल्याचेही डॉ सारिका क्षीरसागर यांनी सांगितले.येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नसून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. जुने-नवे कार्यकर्ते मिळून एक दिलाने काम करू. झालेल्या चुका टाळून आगामी निवडणुकांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे बोलताना डॉ योगेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.