
बीड. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे काल बीड शहरात आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, नवीन सरकार स्थापन झाले की मी पुन्हा उपोषणापासून बसणार असा इशारा दिला. राजकारण आपल्या मराठा समाजासाठी महत्त्वाचे नसून फक्त गोरगरिबाच्या लेकरांना आरक्षण हाच आपला मुख्य मुद्दा,मागणी आहे. त्यामुळे मराठा समाजातील लेकरांच्या भविष्यासाठी आरक्षणाचा विचार करा. तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आरक्षण हवे आहे. त्यामुळे एकजुटीने आरक्षणाच्या मागणीवर तुटून पडा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. मंगळवारी बीडमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.मराठा समाजाच्या निम्मे लोकांनी शेतात काम करावे. निम्मे लोकांनी अांतरवलीत यावे.कामे उरूकन घ्या सरकार स्थापन झाले की मी अंतरवाली सराटी येथे सामूहिक अामरण उपोषण सुरूकरणार आहे.मराठा समाजाने आता निवडणूक डोक्यातून काढून टाकावी. आता लढाई लेकरांच्या भविष्यासाठी आहे.कारण लेकाराला उद्या ॲडमीशन घ्यायचे आहे. त्याला इंजिनियर,डॉक्टर, तहसीलदार, पोलिसकरायचे आहे. त्याला आरक्षणाचीगरज आहे. ज्याला तुम्ही मतदान केले आहे, त्या पक्षातील नेत्यांना सांगा. तो कोणत्याही पक्षाचा असेल तरी मराठा आरक्षणासाठी भांडायला लावा. मराठा समाजाला आवाहन करत म्हणाले, निवडणुकीचं, राजकारणाचं खुळ आता डोक्यातून काढून टाका. वेडेपणा करू नका. तुमचा नेता मंत्री झाला असेल, आमदार झाला असेल तर त्याच्या गुलालात नाचू नका. तो तुम्हाला नाचवेल.परंतु, तुमच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकरांच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकराला शाळा, महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तर तिथे तो मदत करणार नाही. त्याला नोकरी लावून देणार नाही. आगामी काळात वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या भरत्या निघणार आहेत, त्यामुळे आरक्षणासाठी तुटून पडा.असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.