वाळू माफियाचा शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला ! एक गंभीर जखमी.
चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत राजरोस वाळू उपसा.

बीड जिल्ह्यातील वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी असताना देखील गेवराई तालुक्यासह पिंपळनेर माजलगाव मध्ये राज रोज वाळू उपसा होत आहे याकडे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने वाळू माफिया नंगानाच करत आहेत. गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाणे हद्दीतील सुरळे गावातील शेतकऱ्यावर वाळू माफियांने कोयता हल्ला केला असून जनार्दन शिरसाटसह चार शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.चार शेतकऱ्यावर गेवराई येथे रुग्णालयात उपचार सुरू असून एकाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रात्रीतून त्या परिसरातून शंभर पेक्षा जास्त वाळू गाड्या रात्रभर सुरू आहेत.शेतकऱ्याचा ऊस याच रस्त्यावरून जात असल्याने. रस्त्यावर उसाची गाडी का घेऊन जात आहे म्हणून आम्हाला त्याचा अडथळा होतोय म्हणून वाळूमाफियाची या शेतकऱ्याला व कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तात्काळ वाळू माफियाचा बंदोबस करून या परिसरातील वाळू उपसा व वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जखमी शेतकऱ्याचा पोलिसांनी जबाब घेतला असून वाळू माफिया विरोधात असलेल्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.