बीड शहर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर.26/11हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली !
शहर पोलीस ठाणे व शांतता कमिटीचा उपक्रम.

बीड शहर पोलीस ठाणे व शांतता कमिटी यांनी मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसासह, नागरिकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने अनेक नागरिक या हल्ल्यात मृत पावले असून पोलीस कर्मचारी अधिकारी शहीद झाले.तर कित्येक नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. त्यामुळे बीड शहर पोलीस ठाणे आणि शांतता कमिटीच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आज बुधवारी दि. २७ शहर पोलीस ठाणे येथे सकाळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी रक्तदान करुन या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, शहीद पोलिसांना श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉक्टर, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी आणि शांतता कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.