
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील मुळुकवाडी येथील शेतकरी कृष्णा मल्हारी कानडे यांच्या कदम वस्ती येथील घरी आज दि.२७ बुधवार रोजी भरदिवसा चोरट्यांनी घर फोडुन सुटकेस मधील रोख ४० हजार रुपये गायब केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी कानडे यांच्या घरी पाहणी करत नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनी चंद्रकांत गोसावी यांना फोनवरून कल्पना दिली असुन कर्मचाऱ्यांना पाठवतो असे गोसावी म्हणाले.
आज दि.२७ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता कृष्णा कानडे, त्यांच्या पत्नी सुरेखा कानडे व वडील मल्हारी कानडे हे कर्जणी येथे लग्नासाठी गेले होते. रस्त्याच्या पलिकडील अर्धा किलोमीटर अंतरावरील शेतात आद्रक खुरपणी करत होते.सायंकाळी ६ वाजता शेतातुन परतल्यानंतर घराला कुलूप दिसले नाहीत.घर केवळ लोटलेले होते. घरात पाहिले असता घरातील कपाट उघडलेले आणि आतील कपडे वगैरे सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसुन आले तसेच घरातील डब्बे उघडुन विखुरलेल्या अवस्थेत होते. याची कल्पना कृष्णा कानडे यांनी फोनवरून डॉ.गणेश ढवळे यांना दिल्यानंतर डॉ.गणेश ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन फोटो आणि व्हिडिओ काढुन नेकनुर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना फोन वरून कल्पना दिली. घटनास्थळी पो.हे. दत्तात्रय बळवंत व पो.शि.बालासाहेब ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.