जन्म प्रमाणपत्रासाठी जिल्हा रूग्णालयात नागरिकांची आर्थिक लूट!
डॉ.अशोक थोरात यांनी यांनी लक्ष देण्याची मागणी.

बीड (प्रतिनिधी):-शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी,विविध शासकीय योजना,रेशन कार्ड शैक्षणिक व इतर कामासाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक असल्याने जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात गर्दी होत आहे.हे प्रमाणपत्र देण्यासाठी सर्रास नागरिकांची लूट सुरू असून याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी लक्ष घालून दोशी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. जन्म प्रमाणपत्र हा प्रमुख पुरावा मानला जाणार असल्याने अनेकजण जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथे गर्दी करीत आहेत. दवाखान्यात जन्मलेल्याबाळाची जन्म बीड येथील कोणत्या खाजगी दवाखान्यात झाला तरी त्याची नोंद बीड शासकीय रुग्णालयात होते जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी दवाखान्यात मिळते. त्यामुळे शेकडो नागरिक गदीं करीत आहेत. यासाठी मात्र येथील नियुक्त असलेले कर्मचारी नागरिकांची सर्रास लूट करीत आहेत.100 ते 500 रुपये घेऊन दोन दिवसात प्रमाणपत्र दिले जाते. रुग्णालय परिसरातील दलाल हे कर्मचाऱ्यांना हाताखाली धरून ते प्रमाणपत्र देण्यासाठी आग्रह धरताना दिसून येत आहेत. काही बडे लोक व दलाल तर कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप वर दवाखान्यातील डिस्चार्ज कार्ड, आई वडिलांचे आधार कार्ड व बाळाचे नाव पाठवून तात्काळ काम करून घेत असल्याचे दिसत आहे. परंतु काही खेड्यातून येणारे व गरिबांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात वारंवार चकरा माराव्या लागतात, त्यांना विविध कारणे सांगून टाळले जाते परंतु जे पैसे देतात त्यांचे काम तात्काळ केले जाते.त्यामुळे बीड शल्यचिकित्सक डॉ.थोरात यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी होणारी लूट थांबवावी, प्रमाणपत्र लवकर मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात व पैसे देऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकात होत आहे. नागरिकांची लूट थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे.