https://youtu.be/WX8kydixSeA?si=HCKorM1rNwO52xTI बीड शहरात शाळा,महाविद्यालय,कोचिंग क्लासेस व रहदारीच्या ठिकाणी बुलेट राजा टवाळखोरी करणाऱ्या आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणाऱ्या बुलेट चालकांवर वाहतूक पोलीस शाखेने कारवाई केली. बुलेटच्या आवाजापासून ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. या कारवाईत, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर काढून त्यावर नगर रोड वर रोडरोलर चालवण्यात आला.यामुळे बुलेट राजा चा आवाज बंद होऊन टवाळखोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले. या प्रकाराची जिल्हाभर चर्चा होत आहे. मोठ्या आवाजाचे सायलेन्सर हे ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेने हा धडक निर्णय घेतला. ही कारवाई बीड जिल्ह्यातील केज, आंबेजोगाई, गेवराई आणि इतर ठिकाणी करण्यात आली आहे. ही मोहीम पोलीस निरीक्षक सानप, डीवायएसपी विश्वंभर गोल्डे आणि वाहतूक पोलीस शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली. या उपक्रमामुळे वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि नागरिकांकडूनही या उपक्रमाला पाठिंबा मिळत आहे. या कठोर कारवाईमुळे बुलेटचालकांना चांगलाच धडा मिळाला असून भविष्यात टवाळखोरी थांबेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.