
मागील काही महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील काही भागात बिबट्या दिसल्याने नागरी भयभीत झाले होते. वन विभाग जंगल भागात बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याची माहिती मिळत होती. परंतु बिबट्या दिसल्याच्या अफवाच नागरिकाकडून जास्त पसरवल्या जात होत्या.त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.तर शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळले होते. बऱ्याच महिन्याच्या कालावधीनंतर बिबट्या आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर व पाटोदा या दोन गावाच्या लेंडी शिवारात त्या रस्त्याच्या बाजूला फिरताना दिसला त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले.