
- महाराष्ट्रात दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती असतांना देखील त्याची अंमलबजावणी होत नव्हती. हेल्मेट वापरण्यास दुचाकी स्वार उदासीन असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे रस्ते अपघातात दुचाकी अपघातात केवळ डोक्यात हेल्मेट नसल्यामुळे अपघातात दुचाकीस्वार मयत होत असल्याचा घटना देखील समोर आलेल्या आहेत. आता तर अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) विभाग यांनी २५ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची सक्त ताकिद पोलीस विभागाला दिलेली आहे.अप्पर पोलीस महासंचालक मुंबई वाहतूक यांच्या नविन नियमानुसार दुचाकी चालक व दुचाकीवर मागे बसलेला अशा दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आलेली असून हेल्मेट नसलेल्यांवर थेट १००० रुपये दंड आकारला जाणार असून त्या आदेशाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.अप्पर पोलीस महासंचालक मुंबई वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परिपत्रक मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर पुणे शहर,नागपूर शहर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर शहर, नवी मुंबई, अमरावती शहर,चिंचवड, मीरा-भाईंदर, वसई विरार,मा.पोलीस सह आयुक्त वाहतूक मुंबई मा. पोलीसअधीक्षक अकोला, अमरावती ग्रा,बुलढाणा,यवतमाळ,वाशिम,छत्रपती संभाजी,नगर ग्रामीण,जालना,बीड, धाराशिव,नांदेड,लातूर,परभणी,हिंगोली,कोल्हापूर,पुणे ग्रामीण, सांगली सातारा, भंडारा, सोलापूर ग्रामीण, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा,नागपूर ग्रामीण,अहमदनगर,धुळे,जळगाव,नाशिक ग्रामीण, नंदुरबार, रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण व पालघर यांना देखील देण्यात आलेले असुन त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे पोलीसांनी केलेल्या कारवाईतून समोर येईल. परंतु हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वरां कडून दंड वसूल करण्यात येणार आहे.
.