परळीत डॉक्टर कडून महिलेची छेडछाड !
डॉक्टरला अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन.

परळी शहरातील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या महिला रुग्णाची डॉक्टरने तपासणी करताना छेडछाड केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलिस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री ८ वाजता ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली.शहरातील एका डॉक्टरने स्वत:च्या दवाखान्यात तपासणी करताना एका महिला रुग्णाची छेड काढल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाण्यासमोरील एकत्रीत येत जोरदार घोषणाबाजी देत हे आंदोलन करून डॉक्टरच्या अटकेची मागणी लावुन धरली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. दरम्यान रात्री ९.३० नंतरही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी सुरू असताना शहरातील डॉ.यशवंत उर्फ दुष्यंत देशमुख यांच्या कृष्णा टॉकीज समोरील दवाखाना व निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.