ताज्या घडामोडी

वाळू माफियांनी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाला धडक देत जीवे मारण्याची धमकी !

माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बीड जिल्ह्यामध्ये वाळू उपसा व वाहतुकिवर बंदी असताना देखील दररोज शेकडे वाहनाने महसूलच्या अर्थपूर्ण केल्यानेच राजरोस मुरूम वाहतूक केली जाते.तर बीड शहरातील अनेकांनी वाळूचे साठे केले आहेत.बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड गेवराई महामार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवाचा पाठलाग करून ती वाहने पकडण्याची घटना ताजी असतानाच वाळू तस्करीच्या विरोधात कारवाईसाठी गस्तीवर असलेले उपजिल्हाधिकाऱ्यांच्च्या वाहनाचा वाळू माफियांनी पाठलाग करुन त्यांच्या वाहनाला धडक देत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी रात्री, माजलगाव तालुक्यातील टाकरवण- शेलगावथडी येथे घडली.या प्रकरणी उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले यांच्या तक्रारी वरून दोघांवर माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलआहे. दुसरीकडे बीड तालुक्यातील मांजरसुंब्या जवळ अवैध वाळूवाहतूक करणारा ट्रक बीडच्या नायब तहसीलदार प्रशांत जाधववर यांनी पकडून पाच ब्रासवाळू जप्त केली आहे. सदरील ट्रक नेकनूर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.माजलगाव तालुक्यात वाळूमाफियांच्या विरोधात तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. माजलगावचे उपविभागीय अधिकारीगौरव इंगोले यांच्या तक्रारीवरुन, माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल झाला आहे.साहेब इकडे फिराल तरयाद राखा, गाठ आमच्याशी आहे अशी धकमी दिली.माजलगावचे उपजिल्हाधिकारी इंगोले यांनी पाठलाग करणाऱ्या वाहन चालकांची चौकशी केली असता साहेब तुम्ही ईकडे काय करताय, इकडे फिरु नका, इकडे फिराल तर याद राखा, अशी धमकीदेत त्यांच्या वाहनाला धडक देऊन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले यांच्या तक्रारीवरुन करण सोमनाथ मोटे व संजय रामदास पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button