
कडा (बा. म.पवार) गेल्या दोन महिन्यापासून कडा व परिसरातील शेतकऱ्यांना थ्री फेज लाईट नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते तर सिंगल फेजवर विद्युत पुरवठा सुरू होता
मात्र विधानसभेचा निकाल लागतच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस साहेब यांनी तात्काळ लक्ष घालून अवघ्या तीन दिवसांमध्ये 33kv चा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला याबद्दल शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज किंवा उद्या विद्युत पुरवठा सुरळीत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे कड्यामध्ये ट्रांसफार्मर दाखल होतास शेतकरी व सुरेश धस समर्थकांनी आनंद व्यक्त करत तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे