बळवंतराव कदम यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !
बळवंतराव कदम यांचा मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग.

बीड : विविध सामाजिक चळवळ, व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे बळवंतराव कदम यांचे आज हृदयविकारचे तीव्र झटक्याने झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच हळहळ व्यक्त होत आहे.विद्यार्थी दसेपासून ते गेल्या अनेक वर्षापासून चळवळीमध्ये काम करणारे बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या रेल्वे प्रश्नावर अनेक आंदोलनामध्ये सहभागी असणारे मराठा आरक्षणामध्ये सक्रिय सहभागी असणारे अनेक आंदोलनामधील गुन्हे स्वतःवर दाखल झाले तरी आंदोलनाची नाळ न तुटू दिली नाही. तसेच मांजरसुंबा लगतच्या गावात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी इंग्लिश स्कूल नसल्याने त्यांनी मांजरसुंबा येथे शिखर इंग्लिश स्कूल या नावाने विद्यार्थ्यासाठी शाळा सुरू केली होती. त्यामुळे शैक्षणिक कार्यात देखील त्याचे मोलाचे योगदान होते. शैक्षणिक चळवळीतील घाटावरील सहकारी बळवंतराव कदम यांचे हृदयविकाराने निधन झाल्याने मित्रपरिवार हळहळ व्यक्त करत आहेत.