मोबाईल हिसकावून पळणारी टोळी जेरबंद !
मोबाईल सह दुचाकी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

बीड जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून पायी जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा घटनात वाढ झाली होती. अनेकांचे मोबाईल असेच पसार झालं होते परंतु काही नागरिकांनी तक्रार दिल्या नसल्याने मोबाईल चोरांचे प्रमाण वाढले होते. अंबाजोगाई शहरात मोटार सायकल वर येवुन पाई जात असलेल्या व्यक्तीचे मोबाईल हिसकावुन नेवुन चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती दरम्यान दोन गुन्हयांची नोंद पो.स्टे. अंबाजोगाई शहर ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली होती. सदर चोरीचे अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी उघडकीस न आलेल्या गुन्हयाचा आढावा घेवुन उघडकीस न आलेले जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख यांनी अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या गुन्हयांचे विश्लेषण करुन स्थागुशा बीड येथील पोउपनि सुतळे यांना याकामी पाचारण केले. पोउपनि सुतळे यांनी दिनांक २८/ ११/२०२४ रोजी अंबाजोगाई शहर आरोपी शोध घेत असतांना गुप्त बातमी मिळाली की, निखील लक्ष्मण घाडगे रा. दौनापुर याचेकडे चोरीचा १० प्लस मोबाईल असुन तो मुकुंदराज सभागृह समोर आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुन स्था.गु.शा. पथकाने तात्काळ रवाना होवुन नमुद ठिकाणावरुन मोबाईल चोराना ताब्यात घेतले. त्याचे आधी चौकशी केला असता त्याच्याकडे दुचाकी चोरीच्या असल्याची माहिती उघड झाली ही कारवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पो..नी. उस्मान शेख, पो.नी. घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप. सुशांत सुतळे, हनुमंत खेडकर, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाय, अश्विन सुरवसे,राजू पठाण, नितीन वडमारे यांनी केली.