मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज,प्रकृती बिघडली !
मुख्यमंत्री किंवा गृहमंत्रीपद मिळावे... एकनाथ शिंदे

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त झाले. सत्ता स्थापनेची तारीख जाहीर झाली मुंबई येथील आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ सोहळा सोबत उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री कोण याबाबत याबाबतचा चेहरा स्पष्ट झालं नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला 57 जागेवर विजय मिळवला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्री पद हे शिवसेनेलाच मिळावे अशी मागणी केली आहे.काही दिवस महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याने एकनाथ शिंदे यांची धावपळ झाल्याने अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे.त्यांच्या शरीराचे तापमान हे १०४ओ असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याचे सूत्रांकडून समजत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. डॉक्टर आणि त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरचे उपचार नंतर प्रकृती स्थिर असल्याचे माहिती मिळावी. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तेच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है नाराज असल्याचे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात असून,चर्चेला उधाण आले आले.आज दुपारी एकनाथ शिंदे हे मुंबईला परतणार असल्याची माहिती मिळत आहे.