ताज्या घडामोडी

लाडक्या बहिण(नीता अंधारे)यांनी बीड शहराची वाट लावली !

नगरपालिकेतील सावळा गोंधळ थांबणार का?

बीड नगरपरिषद मुख्याधिकारी पदी नीता अंधारे यांची नियुक्ती झाल्यापासून शहराची अक्षरशः वाट लागली आहे. बीड शहरवासीयाना मूलभूत सुविधा मिळत नसून, ऐन पावसाळ्यात देखील पंधरा दिवसाला पिण्याचे पाणी,जागोजागी कचऱ्याचे साचलेले ढीग, मुख्यराचा तसेच गुल्लूगोलेतील विद्युत खांबावरील लाईट बंद, नालीसफाई झाली नसल्याने रस्त्यावर येणारे गटाराचे पाणी, कित्येक महिन्यापासून लिक्विडेटर,तसेच धूर फवारणी नसल्याने बीड शहरवासीयाचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम नीता अंधारे यांनी केले. एका रस्ते कामाचे दोन वेळ बिल देण्यात मुख्याधिकारी अंधारे यांचा सिंहाचा वाटा आहे.

बीड शहरातील कित्येक रस्त्याचे बोगस कामे झाले असून त्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देऊन देखील त्या गुत्तेदाराची बिल टक्केवारी घेऊन दिल्या असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. परंतु काही ठराविक गुत्तेदाराना त्या हाताखाली धरून बोगस काम असल्याची माहिती असताना देखील फक्त टक्केवारीमुळे त्यांची बिल दिले जातात. तेसेच नगरपालिकेतील फाईल रमाई घरकुल,पंतप्रधान घरकुल व रस्त्याचे काम झालेले बिलावर सह्या करण्यासाठी अंधारे मॅडमच्या घरी कर्मचारी फाईल घेऊन जातात.मूख्याधिकारी अंधारे यांना परळी व आष्टीतून आशीर्वाद असल्याने त्या कोणालाच जुमानत नाहीत. त्यामुळे बीड शहराची अक्षरशः वाट लागली आहे.यामुळे नगरपालिकेमध्ये सावळा गोंधळ सुरू असून, नगरपालिकेवर प्रशासक म्हणून असलेल्या कविता जाधव यांनी जाणीवपूर्वक नगरपालिका प्रशासनात लक्ष घालण्याची गरज आहे. नगरपालिके अंतर्गत बोगस बिलांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, बाबर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. मुख्याधिकारी असलेल्या नीता अंधारे आणि त्यांच्या सोबतच्या काही कथित लोकांनी नगरपालिकेत नंगानाच बालविला आहे. झालेल्या बोगस कामांची चौकशी करून कारवाई होण्याची गरज आहे.मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी पदभार हाती नगरपरिषदेत अजच कारभाराचा गजब पॅटर्न सुरू असून, याची शहरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चा आहे. त्यांच्या काळात शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यांच्या विरोधात अनेक आंदोलने झाली असून, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन तर नेहमीचेच झाले आहे. याची मोठी ओरड होत असल्याने अंधारे यांची बदलीची वेळोवेळी चर्चा झाली. पण त्यांना परळी आणि आष्टीचा आशीर्वाद असल्याने बदलीची चर्चा होते पण बदली काही होत नाही. अशी जोरदार चर्चा आहे. या आशीर्वादामुळे कोणालाही भीक घालत नसून आपल्या मर्जीने काम करतात. त्या येतात कधी जातात कधी वरच काही नेम नाही. यामुळे नागरिकांच्या कामांचा खेळ खंडोबा झाला आहे. बीड शहरवासीयाच्या मूलभूत प्रश्न कडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच टक्केवारीवरच जास्त लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने बीड शहरवासीयांना मूलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी बीड शहरातील नागरिक करत आहेत.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button