कुटेच्या कंपणीतील मशीन,साहित्य मध्यरात्री कोण पळवतय ? पहा
पोलीसांनी कंपनी सील केली असताना साहित्य कोण लंपास करतय.?

बीड: ज्ञानराधा मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुरेश कुटे यांनी जादा व्याजदराचे आमिष दाखवून लाखो लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडविल्याने ज्ञानराधा मल्टिस्टेटचा अध्यक्ष सुरेश कुटे वर बीड जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याने सुरेश कुटे सह इतर कारागृहात आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह पत्नी अर्चना कुटेच्या नावे असलेल्या सर्व मालमत्ता सील केल्या होत्या. आता ते सर्व पोलिसांच्या ताब्यात आहे; परंतु आता याच जप्त केलेल्या मालमत्तांची रात्रीच्या वेळी चोरी केली जात आहे.तीन दिवसांपूर्वी क्रेन व कंटेनरद्वारे कोट्यवधी रुपयांच्या मशिनरी सह इतर साहित्य कोण पळवतय? बीड शहरातील एमआयडीसी भागातील कुठेच्या कंपनीतील मशनरी सह साहित्य लंपास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून,पोलिस काय कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे. बीडमधील सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट, तर अर्चना कुटे यांनी तिरूमला ग्रुपची उभारणी केली. तिरुमला ग्रुपचे वेगवेगळे प्रॉडक्ट राज्यासह परराज्यातही जात होते; तर ज्ञानराधाच्याही ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. यात लाखो ठेवीदारांच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.त्या ठेवी पमत मिळण्याच्या आशा आता मावळ्या आहेत.
कुटे च्या जप्त केलेल्या मालमत्ता पोलिसांनी सिल केल्या होत्या त्याचा लिलाव करून तेच पैसे ठेवीदारांना परत केले जाणार होते अशी माहिती पोलीस देत होते. परंतु जर अशा प्रकारे महागड्या मशिनरीची पोलिसांच्या परस्पर पळवल्या जात असतील तर ठेवीदारांचे पैसे कसे मिळणार? असा प्रश्न पडला आहे. सध्या तरी या व्हिडीओमुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.महागड्या मशिनरी क्रेनद्वारे कंटेनर, ट्रकमध्ये टाकून लंपास कोण करत आहेत. आता या प्रकरणात पोलिस तपास करून गुन्हा दाखल करणार की अभय देणार? याकडे लक्ष लागले आहे.