
बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली. त्यावर बीड पोलीस प्रशासनाने व स्थानिक गुन्हे शाखेने अनेक दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणल्या असून दुचाकी चोराकडून शेकडो दुचाकी जप्त करण्यात आल्या. परंतु तरीही दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. नेकनूर बाजारपेठेत दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास मोराळे नामक व्यक्तीने हॉटेल समोर लावलेली दुचाकी चोरून घेऊन जातानाचा सीसीटीव्ही समोर आला असून दिवसा ढवळ्या दुचाकी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली.नेकनूर येथील गजबजलेल्या बाजारपेठेच्या ठिकाणाहून दुचाकी चोरी झाल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे. दिवसा दुचाकी चोरून चोरांनी पोलीसापुढे एक प्रकारचे आव्हानच दिले आहे.