
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 234 जागेवर घवघवीत यश मिळवून महाराष्ट्रात नवीन इतिहासात घडवला.त्यामध्ये भाजपचा १३२ जागेवर विजय मिळाल्याने मुख्यमंत्री भाजपचा असे जाहीर झाले. विधानसभेचा निकाल २३ तारखेला लागला तेव्हापासून मुख्यमंत्री कोण याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री पदवर दावा केला होता. त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार नसल्याचे माहित होतात एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या मूळ गावी परतले होते. मुख्यमंत्री नाराज असलेल्या चर्चा राज्यभर झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे जाणण्यासाठी यासाठी अनेक नेते व महाराष्ट्रातील जनता उत्सुक होती, परंतु आज मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस च्या नावावर शिक्का मुहूर्त झाला असून मुख्यमंत्री फडणवीस विराजमान होणार असल्याने भाजप कार्यकर्त्यां व नेत्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.दिनाक ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.