ताज्या घडामोडी

शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले !

पवनचक्की वाल्यांचा मनमानी कारभार थांबेना.

 

बीड:- (दि.०३) बीड तालुक्यातील बालाघाटावरील पवनचक्की कंपन्यांचा धुमाकूळ सुरूच असुन पोलिस प्रशासनाला हाताशी धरून १ रूपयाही मावेजा अथवा नोटीस न देताच उभ्या ऊसाच्या पिकांचे नुकसान करत स्टींगिंग म्हणजे तार ओढणे सुरू असल्याने मावेजा मिळण्यासाठी सुलतानपुर येथील शेतकरी पंजाब अनुरथ नाईकवाडे वय ४२ वर्ष यांने आज दि.३ मंगळवार रोजी दुपारी साडे ३ च्या दरम्यान कंपनीच्या मनमानी कारभारामुळे न्याय मिळत नसल्याने अखेर पोलिस प्रशासनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे दुर्घटना टळली.पोलिस प्रशासनाने पंजाब अनुरथ नाईकवाडे व त्यांचे वडील अनुरथ नाईकवाडे यांना शासकीय कामकाजात अडथळा आणला व आत्महत्येचा प्रयत्न म्हणून पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करावयाचा आहे म्हणून चौसाळा पोलिस चौकीत आणले.

 

मावेजा न देताच पवनचक्की कंपनी व पोलिस प्रशासनाच्या दबावाखाली दांडगाईने काम सुरू केल्याने आत्मदहनाचा प्रयत्न:- पिडीत शेतकरी पंजाब येडे 

ओटु पावर पवनचक्की कंपन्यांच्या अधिका-यांनी मला कोणताही पुर्वसुचना व नोटीस न देताच माझ्या सुलतानपुर शिवारातील गट नंबर २४७,२५०,२५१ मधील उभ्या ऊसाच्या पिकातुन १ रुपयाही मावेजा न देताच काम सुरू करत शासनाचे आदेश असल्याचे सांगत पवनचक्की कंपनीचे अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी माझी कोणतीही बाजु ऐकुन न घेतल्याने मला शेवटी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला.परंतु माझी तक्रार ऐकून न घेताच अगदी गुन्हेगाराप्रमाणे मला व माझ्या वयोवृद्ध वडीलांना पोलिस अधीक्षक यांचे आदेश असल्याचे सांगत सपोनी चंद्रकांत गोसावी यांच्या टीमने चौसाळा पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यासाठी आणले.

 

पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची :- सपोनी चंद्रकांत गोसावी 

 पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पवनचक्की कंपन्यांनी घेतलेल्या पोलिस संरक्षण अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची असुन आम्ही ती पार पाडत आहोत. चौसाळा पोलिस चौकीत करून पंजाब नाईकवाडे व त्यांच्या वडीलांना गुन्हे दाखल न करता समज देऊन सोडण्यात आले आहे. असे सपोनी चंद्रकांत गोसावी यांनी सांगितले.

पवनचक्की कंपन्यांनी बालाघाटावर गेल्या २ वर्षांपासून उच्छाद मांडला असुन शेतकऱ्यांच्या अडाणी पणाचा फायदा घेऊन स्थानिक व बाहेरील गुंड बाळगुन आर्थिक लुट सुरू असुन पोलिस प्रशासनाला हाताशी धरून मनमानी कारभार करत आहेत. बालाघाटावरील शेतकरी पवनचक्की कंपन्यांच्या दहशतीखाली असुन पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली कंपन्यांपुढे लोटांगण घालत असुन शेतकऱ्यांवर दडपशाही करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मग नेमका प्रश्न पडतो पोलिस प्रशासन शेतकऱ्यांसाठी काम करतंय की पवनचक्की कंपन्यांसाठी असा प्रश्न उपस्थित करत मग पिडीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी कोणाची?? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहै.

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button