
बीड दि.3 (प्रतिनिधी): महाराष्ट्रामध्ये तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना देखील बीड जिल्ह्यात सर्रासपणे खुलेआम गुटखा विक्री होते. याकडे अन्न व औषध प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यानेच खुलेआम गुटखा विक्री होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात किराणा दुकान, पान टपरी,हॉटेल मध्ये सहज गुटखा उपलब्ध होतो.API दराडे यांना आंबेजोगाई शहरात एक गुटक्याचे गोडाऊन असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अंबाजोगाई शहरातील एका गुटख्याच्या गोडावूनवर छापा मारून लाखोंचा माल ताब्यात घेतला.बाळराजे दराडे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर वाळू,मुरूम, बनावट ग्रीस, गुटखा यावर मोठ्या कारवाया केल्या होत्या. बाळराजे दराडे यांनी पुन्हा एकदा अवैध धंद्यांवाल्यांकडे आपला मोर्चा वळविला असून अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजन या गोडावूनवर छापा मारून रजनीगंधा,आर.एम.डी, विमल, गोवा, बाबा या नावाचा गुटखा ताब्यात घेतला आहे. या कारवाईत 10 लाख 67 हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळत असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे,पो.ह.मोराळे,.मुंडे, पो. मोराळेपो.मस्के, पो.ना.नामदेव सानप यांचा सहभाग होता.या कारवाईने अवैधधंदे करणाराचे व गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहेत.