बीड शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय !
चोरट्याची टोळीची सीसीटीव्हीत कैद,नागरिकात भीतीचे वातावरण.

बीड शहरात मागील काही महिन्यापासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता.बीड शहर तसेच ग्रामीण भागात रोज कुठे ना कुठे चोरी झाल्याच्या किंवा चोरटे दिसल्याच्या घटना घडत होत्या. काही नागरिकांनी तर चोरांच्या भीतीने आपल्या भागात रात्रीची ग्रस्त सुरू केली होती. ग्रामीण भागात तर चोरटे ड्रोन ने टेहाळणी करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या,त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले होते. बीड शहरात दिनांक ३ डिसेंबर मंगळवार रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंकुश नगर मधील भागात सहा चोरांचे टोळके फिरताना एक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या भागातील एका घरी कोणी नसल्याचे पाहून चोरटे एका घरासमोरील गेटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होते. घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे चोरट्याच्या लक्षात आल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व त्या घरापासून चोरट्यांनी पळ काढला. बीड शहरात पुन्हा चोरट्यांचे टोळके दिसल्याने अंकुश नगर भागातील नागरीकात भीतीचे वतावरन पसरले असून पोलिसांनी तात्काळ चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.