
राज्यातील विधानसभेचा निकाल गेल्या आठवड्यातच लागला असून यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.त्यामुळें भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले होते.महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. या निर्णयाने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरु झाला आहे.भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येत बहुमत सिद्ध केल्यावर फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.फडणवीस यांनी याआधी 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्रिपद भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणि धोरणे राबविण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा एकदा ही जबाबदारी मिळाल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.