API गणेश मुंडे यांची गेवराई येथे बदली.
गणेश मुंडे यांचा अवैध धंदेवाल्यानी घेतला होता धसका.

बीड दि.बीड स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी बीड जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात अनेक कारवाया केल्याने चांगले चर्चेत आले अवैध धंदेवाल्यांनी त्यांचा चांगला धसका घेतला होता. गेवराई तालुक्यातील वाळू उपसा वाहतूक करणाऱ्यावर गणेश मुंडे यांनी बेधडक कारवाया केल्या होत्या. तसेच गोदापत्रात जाऊन देखील केनी सह वाळू उपसा करणारे साहित्य जप्त केले होते, आष्टी मध्ये पत्त्याच्या क्लब, गेवराई मटक्यावर धाडी मारल्याने अवैध धंदे काही प्रमाणात कमी झाले होते. गणेश मुंडे यांची बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेतून धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस म्हणून सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांची बदली झाली होती. 3 डिसेंबर रोजी गणेश मुंडे यांची पुन्हा बीड जिल्ह्यात बदली झाली आहे.त्यांची महामार्ग पोलीस गेवराई येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विनंतीवरून त्यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश अरविंद साळवे पोलीस अधीक्षक (मुख्यालय), अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) मुंबई यांनी काढले आहेत. गणेश मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत असताना तसेच पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक म्हणून मोठ्या कारवाया केलेल्याने हायवे धंद्यावाल्यांनी त्याचा चांगला धसका घेतला होता.